पालिकेच्या डोंबिवलीतील ह प्रभागाने शासनाच्या आदेशावरून चोवीस अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या बांधकामांचे फक्त वीज, पाणी तोडून राहिलेली कारवाई संथ गतीने सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
काही प्रभागांमधील अधिकारी अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्यात येतील अशा आक्रमक भूमिकेत आहेत. टिटवाळा, कोळसेवाडी, काटेमानिवली, खडेगोळवली, आयरेगाव, कोपर पूर्व रेल्वे स्थानक, डोंबिवली पश्चिमेतील गरिबाचा पाडा, चिंचोडय़ाचा पाडा, देवीचा पाडा, मोठागाव ठाकुर्ली भागातील नवीन अनधिकृत बांधकामे सध्या भूमाफियांनी कारवाईला घाबरून बंद ठेवली आहेत. असे असले तरी अनेक ठिकाणी जुन्या चाळींवर मजले चढविण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा