‘लोकसत्ता वास्तुलाभ’ उपक्रमांतर्गत ‘एका घरावर एक घर मोफत’ मिळवण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. विविध गृहनिर्माण समूहांच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमास हजारो लोकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. या उपक्रमाला अनपेक्षित प्रतिसाद मिळत असल्याची भावना बांधकाम व्यासायिकांनी व्यक्त केली आहे.
उपक्रमाला सुरुवात होऊन आठवडा होत नाही तोवर चौकशीची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे, अशी प्रतिक्रिया हायटेक इन्फ्राचे प्रफुल्ल कपुपारा यांनी दिली. या उपक्रमाबद्दल अशीच काहीशी भावना वर्धमान पार्कचे प्रवीण तोसलीवाल यांनीही व्यक्त केली आहे. चाम्र्स ग्रूपचे रॉय जॉन मॅथ्यू यांनी उपक्रमामुळे चौकशी तर वाढलीच; तसेच आमच्या समूहातील विविध प्रकल्पांमध्ये काही जणांनी घरांचे बुकिंग केल्याचेही सांगितले. आता येत्या ३१ मार्च रोजी असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहुर्ताकडे व्यावसायिकांचे लक्ष लागले असून हा दिवस त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या उपक्रमात एका घरावर एक घर मिळवण्यासाठी २२ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत उपक्रमात सहभागी असलेल्या गृहनिर्माण समूहांच्या प्रकल्पांमध्ये नवीन घराचे बुकिंग करणे आवश्यक आहे. त्यावेळी बिल्डरकडून एक फॉर्म देण्यात येतो. यानंतर तुम्ही घराची नोंदणी करून ती कागदपत्रे आणि बिल्डरकडून मिळालेला फॉर्म भरून १५ मेपर्यंत संबंधित बिल्डरकडे सादर करायचा आहे. यातून भाग्यवान विजेत्यांना घर, आंतरराष्ट्रीय सहली यासारखी बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. हा उपक्रम ‘तुलसी इस्टेट’ने प्रस्तुत केला असून ‘केसरी’ सहप्रयोजक आहे. तर जे. के. इलेक्ट्रिॉनिक्स यांचे बक्षिसांसाठी प्रायोजकत्व आहे. या स्पध्रेला नियम व अटी लागू राहतील.
या उपक्रमात सहभागी असलेल्या बिल्डरांची यादी खालीलप्रमाणे.
तुलसी इस्टेट, राज ग्रुप- तुलसी सिटी, मोहन ग्रुप, टाटर फ्लोरेन्स, नीलसिद्धी ग्रुप, चाम्र्स ग्रुप, संघवी ग्रुप, क्वॉलकॉन रियल्टी एलएलपी, ऋतु ग्रुप ऑफ कंपनीज, अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स लि., कर्नाळा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टस प्रा. लि., रोझा ग्रुप-, हाय टेक इन्फ्रा, भावे बिल्डर्स, डेझी गार्डन, आर अॅण्ड सी (वसंत व्हॅली), रिद्धी-सिद्धी ग्रुप, वर्धमान ग्रुप, सुदर्शन निर्माण ग्रुप, श्री गणेश असोसिएट, अरविंद व्हिक्टोरी बिल्डर-, मोरया इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., श्री महावीर पटवा बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स, विरेन इन्फ्रा वेंचर्स प्रा. लि., प्रख्यात इनिशिएटिव्ह (यलो ट्री), कार्तिक डेव्हलपर्स, अद्वितीय मार्केटिंग,अॅडव्हान्टेज होम्स्, साई सृष्टी एंटरप्रायझेस, गुरुकृपा ग्रुप, रौनक ग्रुप, फाइव्ह पी ग्रुप, निखिल कन्स्ट्रक्शन्स, पोद्दार हाऊसिंग,लाभ ग्रुप, नातू परांजपे ग्रुप, थारवानी रियल्टी, संकल्प बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स, क्रिस्टल इन्फ्रा हाऊसिंग प्रा. लि., पंचम हार्मोनी, जे. के. अपार्टमेंट, एम. पी. ग्रुप, स्कायवर्ड व्हिजन डेव्हल्पर्स, श्री व्हीला बिल्डर्स, वर्धमान ग्रुप, युनिक बिल्डकॉन अॅण्ड कनक रियल्टर्स, त्रिवेणी इन्फ्रास्ट्रक्चर्स, महावीर बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स.
एका घरावर एक घर मोफत मिळवण्याची ग्राहकांना संधी
‘लोकसत्ता वास्तुलाभ’ उपक्रमांतर्गत ‘एका घरावर एक घर मोफत’ मिळवण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे.
First published on: 29-03-2014 at 01:08 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buy one get one free home