शहर परिसरात विविध सामाजिक संस्था व संघटनांतर्फे महात्मा फुले पुण्यतिथी व गुरू नानक जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भटके विमुक्त दलित आदिवासी ओबीसी समाज सेवा समिती भटके विमुक्त दलित आदिवासी ओ.बी.सी समाज सेवा समितीच्यावतीने फुले यांची पुण्यतिथी व शीख धर्माचे धर्मगुरू गुरू नानक यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पंचवटीतील विडी कामगारनगर येथे झालेल्या कार्यक्रमात संघटनेचे सरचिटणीस रतन सांगळे यांच्या हस्ते फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर गुरूनानक यांच्या प्रतिमेचे बलविंदरसिंग घटौरे यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी कुलदिपसिंह घटौरे, मांगूलाल जाधव, शलिक चव्हाण आदी उपस्थित होते.
सुभाष वाचनालय
सुभाष सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त कार्यवाह परमानंद पाटील यांच्या हस्ते फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक ग्रंथपाल दत्ता पगार यांनी केले. सहकार्यवाह प्रभाकर खंदारे यांनी आभार मानले. यावेळी वाचनालयाचे कार्याध्यक्ष मारूती तांबे, विश्वस्त रामदास सोनवणे, उर्दू विभाग प्रमुख शेख मो. इकबाल अब्दुल गनी आदी उपस्थित होते.
वैदू समाज मंडळ
वैदू समाजाच्यावतीने कार्याध्यक्ष साहेबराव सवारी पवार यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पवार यांनी राज्यात खऱ्या अर्थाने पूरोगामी चळवळ फुले यांनी सुरू केल्याचे सांगितले. यावेळेस दशरथ हटकर, जिल्हाध्यक्ष अशोक जाधव, बाबासाहेब पवार आदी उपस्थित होते.     

Story img Loader