लहान मुलांना आवडतील अशा कविता घेऊन सहित प्रकाशनाच्या किशोर शिंदे यांनी २०१३ या वर्षांच्या कॅलेंडरची निर्मिती केली आहे. मुलांच्या भावविश्वाशी समरस झालेल्या आणि केवळ त्यांच्यासाठी दर्जेदार साहित्यनिर्मितीचा वसा घेतलेल्या प्रा. अनंत भावे यांच्या कविता या कॅलेंडरवर घेण्यात आल्या आहेत.   कॅलेंडरचे वैशिष्टय़ म्हणजे कॅलेंडरच्या प्रत्येक महिन्याचे पान कोरे ठेवले आहे.  मुलांमध्ये असलेली कल्पकता, सृजनशीलता याबरोबरच त्यांच्यामध्ये वाचनाबद्दल आवड निर्माण होण्यासाठी हे कॅलेंडर उपयुक्त ठरेल असे कॅलेंडरचे समन्वयक किशोर शिंदे यांनी सांगितले.

Story img Loader