भारतीय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी साजरा केल्या जाणार आहे. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय भावना व्यक्त करण्यासाठी अनेक जण तसेच शाळकरी मुलं कागदी व प्लॅस्टीकचे राष्ट्रध्वज हातात घेऊन ध्वजवंदनेला उपस्थित राहत असतात. मात्र, नंतर हे राष्ट्रध्वज इतरत्र टाकून दिल्या जाते, असे न करता राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  
राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्रीय अस्मिता आहे. त्यामुळे राष्ट्रध्वज कुठेही पडून राहू नये, तसेच अशा अवस्थेत सापडलेले सर्व कागदी व प्लॅस्टीकचे राष्ट्रध्वज गोळा करण्यात यावे व राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची खबरदारी घ्यावी. राष्ट्रध्वज इतरत्र आढळून आल्यास ध्वज संहितेतील तरतुदीनुसार नष्ट करण्यात यावे.
ग्रामपंचायत, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, तालुका माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आरोग्य संस्था अशा संस्थांनी पोलीस विभागाच्या मदतीने राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही यासाठी जागरूक राहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच संबंधित शासकीय यंत्रणांना कळविण्यात आले आहे. नागरिकांनीही याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

Story img Loader