राज्य सरकारला ऊसदराच्या मुद्यावर जबाबदारी झटकता येणार नाही. शेतकऱ्यांच्या ऊसदराच्या प्रश्नावर मी शेतकऱ्यांच्या बाजूनेच उभा आहे. शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त दर मिळावा, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला माझा पािठबा आहे, असे मत हमीदवाडा साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी व्यक्त केले.
मंडलिक म्हणाले, राज्य बँकेकडूनच उचल घेऊन शेतकऱ्यांना ऊसदर द्यायचा असतो. त्याचा निर्णय सहकार आणि मुख्यमंत्री घेत असतात. त्यामुळे संघटनेने मागणी केलेला ऊसदर कसा देता येईल अथवा त्यातून काय मार्ग काढायचा हे शासनाने दाखवून द्यायला हवे, तरच कारखानदार त्यासाठी तयार होतील. असे न झाल्यास कारखानदार, शेतकरी संघटना यांच्यात संघर्ष वाढेल. त्यामुळे कोणताच निर्णय होणार नाही. त्याचा फटका गळीत हंगाम लांबल्याने शेतकऱ्यांनाच सोसावा लागणार आहे.
शासनाने भांडणे लावण्यापेक्षा या प्रश्नी वाटाघाटी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने पुढे आले पाहिजे. आम्ही त्यासाठी तयार आहोत. दराबाबत तोडगा न निघाल्यास आपली भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूनेच असेल. खासदार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास आपला पािठबा आहे. या प्रश्नी केंद्र आणि राज्य शासनाबरोबर शेतकरी संघटना आंदोलन करणार असेल तर त्यासही आपला पािठबा आहे.

Story img Loader