यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी कुणाला द्यावी, उमेदवारीबाबतचे निकष कोणते इत्यादी बाबी दिल्लीत पक्षश्रेष्ठींचे मनोगत जाणून घेतल्यानंतरच इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची व मुलाखतीची प्रक्रिया सुरू केली जाईल. लवकरच ही प्रक्रिया सुरू होऊ शकेल, अशी माहिती काँग्रेस
प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी दिली.
त्यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याच्या वृत्ताबाबत ठाकरे म्हणाले की, निवडणूक असली म्हणजे अनेक कार्यकर्त्यांची नावे चच्रेत असतात त्यापकी राहुलचे नाव चच्रेत असू शकते, मात्र कोणाच्याही उमेदवारीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. या पोटनिवडणुकीमुळे राज्य सरकारच्या स्थर्याचा प्रश्नही उद्भवत नाही. निवडून येणाऱ्या उमेदवाराला वर्ष-सव्वावर्षांचा कार्यकाळ मिळणार असला तरी २०१४ ची निवडणूक लक्षात घेता काँॅग्रेस ही निवडणूक गांभीर्यानेच लढणार आहे.
काँॅग्रेसचे आमदार निलेश पारवेकर यांचे २७ जानेवारी २०१३ ला झालेल्या अपघाती निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असल्यामुळे पारवेकर घरण्यातील व्यक्तीला उमेदवारीबाबत प्राधान्य मिळावे, याबाबत सुरू असलेली चर्चा स्वाभाविक असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मान्य केले. लवकरच पक्षश्रेष्ठींचे मनोगत समजल्यावर उमेदवारींबाबतची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही ठाकरे म्हणाले.
पक्षश्रेष्ठींचे मनोगत जाणल्यानंतरच उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया -माणिकराव ठाकरे
यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी कुणाला द्यावी, उमेदवारीबाबतचे निकष कोणते इत्यादी बाबी दिल्लीत पक्षश्रेष्ठींचे मनोगत जाणून घेतल्यानंतरच इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची व मुलाखतीची प्रक्रिया सुरू केली जाईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-05-2013 at 03:57 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candidate application process after listening desire of party supremo manikrao thackrey