एप्रिल-मे च्या दरम्यान होऊ घातलेल्या यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार नीलेश पारवेकर यांच्याच कुटूंबातील कुणाला तरी उमेदवारी दिल्यास सहानुभूतीच्या प्रचंड लाटेवर ती व्यक्ती निवडून येईल, अशी चर्चा कॉंग्रेसमध्ये असल्याने पारवेकर घराण्यातील कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, हा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चच्रेचा विषय आहे.
कॉग्रेसचे यवतमाळचे तरुण आमदार नीलेश पारवेकर यांचे २७ जानेवारीला यवतमाळ विधानसभा मतदार संघातील पांढुर्णा गावाजवळ भीषण अपघातात निधन झाले होते. नीलेश पारवेकर हे राहुल ब्रिगेडचे एक सक्रीय सदस्यही होते. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी कायद्याप्रमाणे ६ महिन्याच्या आत पोटनिवडणूक घेणे गरजेचे असते. त्यानुसार निर्वाचन आयोग साधरणत एप्रिल-मे महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने कॉंग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली आहे, मात्र अद्याप कोणत्याच पक्षाचा उमेदवार ठरला नसला तरी कांॅग्रेसने पारवेकर घराण्यातीलच एखाद्याला, विशेषत दिवंगत नीलेश पारवेकर यांच्या पत्नी नलिनी पारवेकर यांना उमेदवारी दिल्यास सहानुभूतीची प्रचंड लाट नलिनी यांच्या पाठीशी राहील, असा कॉगेसचा होरा आहे.
नलिनीशिवाय नीलेश पारवेकरांच्या मातोश्री कांताबाई आणि धाकटा बंधू योगेश पारवेकर यांचाही विचार कॉंग्रेसने करावा, अशी चर्चा आहे, मात्र कांताबाई यांच्याऐवजी योगेश पारवेकर यांचे नाव सध्या चच्रेत आहे. कारण, कांताबाई यांनी योगेश पारवेकर यांच्यासह दिल्लीत राहुल गांधी यांची नुकतीच सांत्वना भेट घेतली आणि या भेटीचा राजकीय वर्तुळात वेगवेगळा अर्थ लावला जात आहे. योगेश पारवेकर हे नीलेश पारवेकर यांच्याइतके राजकारणात प्रभावी नसले आणि केंद्रीय नेतृत्वापर्यंत त्यांची उठबस नसली तरी यवतमाळच्या राजकारणात ते सक्रीय आहेत. पंचायत समिती आणि सहकार क्षेत्रात त्यांचा अनुभव आहे. विधानसभेची पोटनिवडणूक लढण्यास ते उत्सुक असल्याचीही चर्चा आहे.
विशेष बाब अशी की, यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी करण्यासाठी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आपले दौरे जिल्ह्य़ात वाढवले आहेत, मात्र उमेदवाराच्या नावाबाबत चर्चा न करता निवडणूक जिंकण्यासाठी काय करावे आणि गेल्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्य़ातील विधानसभा मतदार संघाचा समावेश असलेल्या तीनही लोकसभा मतदार संघात कांग्रेसचा पराभव का झाला व पुढील लोकसभा कशा जिंकाव्या याचीच चर्चा करा, असे त्यांनी नेते व कार्यकर्त्यांना सुचविले आहे. यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर आणि िहगोली या तीन लोकसभा मतदार संघात यवतमाळ जिल्ह्य़ातील विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. हे तीनही लोकसभा मतदार संघ कांॅग्रेसने गमावले आहेत.
नीलेश पारवेकर यांच्याच कुटूंबापकी कुणाला तरी उमेदवारी द्यावी आणि सहानुभूतीच्या लाटेचा फायदा पक्षाने करून घ्यावा, असे कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना वाटत असले तरी पक्षश्रेष्ठी मात्र निवडणूक जाहीर होईपर्यंत तरी उमेदवारीबाबत मौन पाळणार असल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा