पनवेलमधील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा सध्या देवीभक्तीने ऊर भरून आला आहे. उमेदवारांनी आपल्या प्रचारासाठी देवीदर्शनाचा आधार घेत गावोगावी साजऱ्या होत असलेल्या नवरात्रोत्सवामध्ये देवीदर्शनाचा सपाटा लावला आहे.
राजकारण आणि भक्तिभाव असा अभूतपूर्व संगम यानिमित्ताने निवडणूक काळात पनवेलच्या उमेदवारांमध्ये पाहायला मिळत आहे.
पनवेल विधानसभा मतदारासंघामध्ये ९५ ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. आदर्श आचारसंहितेच्या बडघ्यामुळे यंदा देवीच्या पुरस्कर्त्यांमध्ये राजकारणी मंडळींचे चेहरे दिसले नाहीत.
परंतु निवडणूक काळात मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी तालुक्यातील मुख्य राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रत्येक सार्वजनिक देवीदर्शनासाठी सिडको वसाहती आणि गावांमध्ये हजेरी लावली आहे. देवीदर्शनानंतर संबंधित नवरात्रोत्सव मंडळाला देणगी देताना या उमेदवारांचे खिशे रिकामी करताना दिसत आहेत. आचारसंहितेमध्ये मतदारांना आमिषे दाखविणे हा जरी गुन्हा असला तरीही देवीसाठी एखाद्या मंडळाला वर्गणी देणे हा नक्कीच गुन्हा नसल्याचा खुलासा या उमेदवारांच्या निकटवर्तीयांकडून केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा