मोटारीची दुचाकीला धडक बसून दुचाकीवरील दाम्पत्य व त्यांची मुलगी असे तिघे गंभीर जखमी झाले. बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शहरानजीक हा प्रकार घडला. चंद्रकांत प्रकाश बोंडे (सिडको वाळूज महानगर) यांनी एमआयडीसी वाळूज पोलिसात याबाबत फिर्याद दिली. बोंडे हे त्यांची पत्नी व मुलीसह मोटारसायकलवरून (एमएच १९ एजी ९१३१) सिडको वाळूज महानगर येथून औरंगाबाद शहराच्या दिशेने चालले होते. मुंबई एक्स्प्रेस हायवेवर टी पॉइंटला दुचाकीला मोटारीने (एमएच १५ सीएम २५२३) धडक दिली. त्यात तिघेही गंभीर जखमी झाले.
मोटारीची दुचाकीला धडक; तिघे जखमी
मोटारीची दुचाकीला धडक बसून दुचाकीवरील दाम्पत्य व त्यांची मुलगी असे तिघे गंभीर जखमी झाले. बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शहरानजीक हा प्रकार घडला. चंद्रकांत प्रकाश बोंडे (सिडको वाळूज महानगर) यांनी एमआयडीसी वाळूज पोलिसात याबाबत फिर्याद दिली.
First published on: 16-11-2012 at 04:31 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car smash to two wheeler three injured