मोटारीची दुचाकीला धडक बसून दुचाकीवरील दाम्पत्य व त्यांची मुलगी असे तिघे गंभीर जखमी झाले. बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शहरानजीक हा प्रकार घडला. चंद्रकांत प्रकाश बोंडे (सिडको वाळूज महानगर) यांनी एमआयडीसी वाळूज पोलिसात याबाबत फिर्याद दिली. बोंडे हे त्यांची पत्नी व मुलीसह मोटारसायकलवरून (एमएच १९ एजी ९१३१) सिडको वाळूज महानगर येथून औरंगाबाद शहराच्या दिशेने चालले होते. मुंबई एक्स्प्रेस हायवेवर टी पॉइंटला दुचाकीला मोटारीने (एमएच १५ सीएम २५२३) धडक दिली. त्यात तिघेही गंभीर जखमी झाले.      

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा