ठाणे शहरामध्ये सोमवारी सोनसाखळी चोरी, जबरी चोरी, घरफोडी तसेच कारमधून दहा लाख रुपयांची बॅग चोरीला गेल्याच्या घटना घडल्या . सोनसाखळी चोरी तसेच घरफोडीचे गुन्हे पुन्हा वाढू लागल्याचे चित्र यामुळे दिसत आहे.  
ठाणे येथील श्रीरंग सोसायटीमध्ये सुमन मधुकर दातार (७६) राहतात. सोमवारी त्या आणि त्यांची मोठी बहीण जयश्री जोग या दोघींच्या गळ्यातील साठ हजारांची सोनसाखळी खेचून चोरांनी पोबारा केला. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघबीळ भागात राहणारे कृपाशंकर लालचंद पांडे (४०) हे  वाराणसी येथे जाण्यासाठी ठाणे आरक्षण कार्यालयाजवळ रांगेत उभे होते. त्या वेळी तुमच्या अगोदर आमचा नंबर आहे, असे सांगत तीन जणांनी मारहाण करुन त्यांच्याकडील साडेतीन हजारांची रोकड लुटून पोबारा केला.  मुंब्रा भागातील तन्वरनगरमधील शबीना इमारतीमधील फैजन ठाकूर यांच्या घर फोडून चोरटय़ांनी कपाटातील एक लाख रुपयांचे दागिने चोरून नेले. ढोकाळी येथील श्रुती पार्कमध्ये डॉक्टर धनंजय दांगट राहतात. त्यांनी इमारतीच्या गेटसमोर कार उभी केली होती. या कारमधून चोरटय़ांनी दहा लाख रुपयांची बॅग चोरून नेली.

Story img Loader