तालुक्यातील म्हसावद येथील एका शिक्षण संस्थेचे सचिव, साक्षीदार व मृताची बनावट स्वाक्षरी करून फसवणूक केल्या प्रकरणी शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह मुलगा, भाऊ व इतरांविरुद्ध जळगाव औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या   प्रकरणात    पाटील   यांना जामीन नाकारण्यात आल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
म्हसावद येथील मूळ रहिवासी अर्जुन पाटील यांनी यासंदर्भात पोलिसात फिर्याद दिली. पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या कागदपत्रांमध्ये गुलाबराव पाटील यांनी फेरफार केली. ते पाळधीचे रहिवासी असतानाही त्यांनी आपण म्हसावदचे रहिवासी असल्याचे दाखवून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पद्मालय ही कायम विनाअनुदानित संस्था गुलाबरावांनी काही दिवसापूर्वी चालविण्यासाठी घेतली होती.
२० एप्रिल २००८ ते २९ जून २०१२ या कालावधीत आपण संस्थेचे सचिव असताना बनावट दस्तावेज तयार करून आपणास डावलण्याचा व संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे अर्जुन पाटील यांनी म्हटले आहे.
या तक्रारीत तथ्य आढळून आल्यानंतर गुलाबरावांसह, त्यांचा मुलगा प्रताप, भाऊ सुनील पाटील, संचालक सुगमचंद पाटील, कैलास पाटील, रामसिंग पाटील यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Story img Loader