आदर्श प्रकरणातील प्रमुख आरोप कन्हैय्यालाल गिडवाणी यांच्या आरोपांमधील धार कमी करण्यासाठी त्यांच्याकडून लाच स्वीकारणारा सीबीआयचा वकील मंदार गोस्वामीविरुद्ध सीबीआयने आरोपपत्र दाखल केले. पाचशे पानांचे आरोपपत्र असून १७ साक्षीदारांची यादी यात आहे.
कन्हैयालाल गिडवानी यांनी त्यांचे कर सल्लागार जे के जगियासी यांच्यामार्फत १.२५ कोटी रुपये सीबीआयचे वकील मंदार गोस्वामी यांना दिले होते, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
आदर्श प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसंबंधीची माहिती तसेच चौकशी करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्यांची रणनीती याबाबतची माहिती देण्यासाठी २५ लाख रुपये गोस्वामी यांना देण्यात आल्याचा दावा सीबीआयने केला होता. या प्रकरणी सीबीआयने जे के जगियासी आणि मंदार गोस्वामी आणि कन्हैयालाल गिडवाणी यांचा मुलगा कैलाश यांना पाच मार्च रोजी अटक केली होती.

Story img Loader