जात पडताळणी समितीच्या वतीने बनावट कागदपत्रांच्या आधारे नांदेडस्थित नगरसेवकाला २००८मध्ये जातीचे प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी समितीचे तत्कालीन अध्यक्ष, सचिव, सदस्य व संबंधित नगरसेवकांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
नांदेड येथील नगरसेवक रहीमखान अहमदखान मसूदखान याने तहसील कार्यालयातून बनावट कागदपत्रांच्या आधारे जुलाहा या जातीचे प्रमाणपत्र मिळविले.
या प्रकरणी २००७मध्ये संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आला.
त्यानंतरही रहीमखानने याच कागदपत्रांच्या आधारे जात पडताळणी समितीकडे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज केला.
नगरसेवकांनी दाखल केलेली कागदपत्रे बनावट असल्याची माहिती असूनही त्याला जातीचे प्रमाणपत्र दिले गेले. त्यामुळे पठाण जफर अलीखान महेमूद अलीखान याने या प्रकरणी जात पडताळणी समितीचे अध्यक्ष एन. नवीनसोना, विभागीय समाजकल्याण अधिकारी तथा समितीचे सदस्य एस. बी. भंडारी, सदस्य सचिव आर. बी. सूर्यवंशी व नगरसेवक रहीमखान अहमदखान यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार या प्रकरणी गुन्हा नोंदविला. नवीनसोना सध्या नागपूरमध्ये, तर भंडारे सोलापूर येथे कार्यरत आहेत. सूर्यवंशी सेवानिवृत्त झाले आहेत. या प्रकरणी पोलीस उपाधीक्षक तिरुपती काकडे तपास करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा