खरेदीखत नोंदणीच्या साक्षांकित प्रतीसाठी दोनशे रुपयांची लाच घेताना सेलू येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक राणू दुभळकर याला परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने शनिवारी १९ रोजी सापळा रचून रंगेहाथ पकडले.
सेलू-परतूर रस्त्यावरील सव्र्हे क्रमांक दहातील प्लॉटिंगमधील प्लॉट क्रमांक ४४ येडे यांनी २००६मध्ये मंदाकिनी देशमुख व जािलदर टाक यांच्याकडून तोंडी व्यवहाराने खरेदी केला. मात्र व्यवहार नोंदणी न झाल्याने येडे यांनी दिवाणी न्यायालयात दावा केला होता. त्यासाठी त्यांना १६ मे २००६ रोजी देशमुख व टाक यांनी विक्री केलेल्या व्यवहारातील कोणत्याही दोन व्यक्तींच्या खरेदीखताच्या नोंदणीच्या छायांकित प्रती पाहिजे होत्या. सेलू दुय्यम निबंधक कार्यालयात त्यांनी प्रतीसाठी अर्जही केला होता. ४ ऑक्टोबर २०१३ रोजी येडे कार्यालयात आले असता, लिपीक दुभळकर याने प्रतीसाठी येडे यांना एक हजार रुपयांची मागणी केली व त्याशिवाय प्रती देणार नसल्याचे सांगितले. त्या वेळी येडे यांनी दोनशे रुपये दिले. मात्र दुभळकर यांनी शासकीय फी सहाशे रुपये व वरचे दोनशे रुपये घेऊन १९ ऑक्टोबर रोजी कार्यालयात येण्यास येडे यांना सांगितले. या वेळी लिपिकास लाच घेताना अटक करण्यात आली.

Story img Loader