राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचा पुन्हा मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून समावेश झाल्याचे समजताच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाके फोडले. पवार यांच्या उद्या होणाऱ्या शपथविधीस उपस्थित राहण्यासाठी शहरातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी रात्री मुंबईस रवाना झाले.
सिंचनाच्या श्वेतपत्रिकेच्या मुद्यावरुन पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद व मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लगेचच त्यांनी पहिला दौरा नगर जिल्ह्य़ाचा केला होता. पक्षाच्या जिल्हा संघटनेच्या बैठकीतही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पवार यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश व्हावा, अशी मागणी, ठराव केले होते. पवार यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होऊन त्यांचा उद्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार असल्याचे वृत्त येथे सायंकाळी येताच पदाधिकारी अंबादास गारुडकर, सोमनाथ धूत, विनित पाऊलबुद्धे, अरिफ शेख, शरद मडूर, अविनाश घुले यांनी धोषणा देत दिल्लीगेट व पुणे रस्त्यावरील पक्ष कार्यालयासमोर एकमेकांना पेढे भरवत, फटाके फोडले. शपथविधीच्या समारंभास उपस्थित राहण्यासाठी अनेक कार्यकर्ते मुंबईस रवाना
 झाले.

Story img Loader