श्रीराम जय राम जय जय रामचा जयघोष.. आकर्षक लोकनृत्य व विविध पौराणिक विषयांवर आधारित चित्ररथ.. शोभायात्रेच्या मार्गावर जागोजोगी भगव्या पताका, ध्वज, केळींच्या पानांचे प्रवेशद्वार, मार्गावर रंगबेरेगी रांगोळ्या आणि रामभक्तांचा प्रचंड उत्साह, जणू काही नागपुरात अयोध्या अवतल्याचे चित्र दिसून आले. नागपूरसह विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि श्रीरामाचा जयजयकार करीत श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
नागपूरचे धार्मिक व सांस्कृतिक वैभव म्हणून देशभरात ओळखली जाणारी श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा पारंपरिक पद्धतीने श्रीरामच्या जयघोषात व रामभक्ताच्या जल्लोशात निघाली. शोभायात्रा पाहण्यासाठी हजारो रामभक्तांनी गर्दी केली होती. यावर्षी शोभायात्रेत पौराणिक व सामाजिक विषयांवर आधारित ५५ चित्ररथ, १५ बहारदार लोकनृत्यांसह छोटय़ा चित्ररथांचाही समावेश होता. गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत दुपारी १२ वाजता प्रभूरामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आल्यानंतर दुपारी ४ वाजता प्रभूरामचंद्रांच्या मूर्ती आकर्षक अशा दिव्यरथात ठेवण्यात आल्या. महापौर अनिल सोले यांच्या हस्ते प्रथम पूजा करण्यात आली. यावेळी यावेळी खासदार विलास मुत्तेमवार, भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी, खासदार अजय संचेती, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, आमदार दीनानाथ पडोळे, विकास कुंभारे, माजी मंत्री रमेश बंग, शेख हुसेन, कृष्णा खोपडे, दयाशंकर तिवारी, जयप्रकाश गुप्ता, प्रवीण दटके, मुन्नालाल गौर, श्यामसुंदर पोद्दार, सुरेश शर्मा, हजारीलाल अग्रवाल आदी उपस्थित होते.
रेल्वे स्टेशन व भावसार चौकातून पोद्दारेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग दुपारपासून बंद करण्यात आला होता. दुपारी १२ वाजेपासून मेयो हॉस्पिटल चौकात एक एक करीत चित्ररथ जमा झाल्यानंतर मुख्य रथाची पूजा करण्यात आली आणि शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभायात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती. हंसापुरी, गांजाखेत, इतवारी, शहीद चौक, बडकस चौक, केळीबाग मार्ग, महाल, शिवाजी पुतळा, शुक्रवार तलाव, कॉटन मार्केट भागातील व्यापारी प्रतिष्ठान, आसपासच्या इमारतीवरूनही शोभायात्रा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. विविध सामाजिक संघटना आणि व्यापारी प्रतिष्ठानातर्फे मार्गावर पिण्याची पाणी, प्रसाद आणि सरबताची सोय करण्यात आली होती. शहरातील विविध चौकात आकर्षक सजावट करण्यात आली.
शोभायात्रा एका जागेवरून शोभायात्रा जाण्यासाठी किमान एक ते सव्वातास वेळ लागत होता. शोभायात्रेच्या प्रारंभी असलेले विविध राज्यातील लोकनृत्य लोकांचे खास आकर्षण होते. यावर्षी १६ लोकनृत्ये सहभागी झाली होती. यावर्षी शिवाजीद्वारे हलाहल विषपान (बैद्यनाथ आयुर्वेद भवन लि.), हनुमानद्वारा ईमसेन गर्वहरण (दै. भास्कर), भगवान शिवद्वारा विषपान (बिग बाजार), बालाजी (द हितवाद), दशावतार (संजय केशरवानी मित्र परिवार), लालबागचा राजा (अमित मेंढेकर मित्र परिवार), साई दर्शन (राजीव जयस्वाल व मित्र परिवार), कामदेवद्वारा भगवान शिव तपस्या भंग (विदर्भ सिमेट अ‍ॅन्ड हार्डवेअर), आदिशक्ती महासूर (राम भंडार), पंचमुखी हनुमान (दिवाकर टोळ), शिवशक्ती दर्शन (रजवाडा पॅलेस), श्रीराम विवाह (विनिर ग्लास इंडस्ट्रीज), चलो केदारनाथ (सहयोग शारदोत्सव मंडळ), श्रीराम भक्त हनुमान (नवयुक शिक्षण संस्था), मॉं गभवती का आर्शीर्वाद (कलगीधर सत्संग मंडळ), महालक्ष्मी अभिषेक (विकी होंडा सव्‍‌र्हिस सेंटर) इत्यादी ५० पेक्षा अधिक चित्ररथ शोभायात्रेत होते.
शोभायात्रेच्या मार्गावर व काही चौकातही विविध संघटनांतर्फे सजावट व आकर्षक देखावे तयार करण्यात आले होते. दुपारच्यावेळी ढगाळ वातावरण असल्याने उरकाडय़ाने नागरिक त्रस्त होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोमीनपुऱ्यात रामरथावर पुष्पवृष्टी
पोद्दारेश्वर मंदिरातून निघालेली शोभायात्रा मोमीनपुरा भागात येताच अमन शांती समितीचे अध्यक्ष बाबा खान यांच्यासह विविध मुस्लिम बांधवांनी रामरथावर पुष्पवृष्टी केली. यावेळी शांतीचे प्रतीक म्हणून कबुतरे उडविण्यात आली. मुस्लिम समाजातील युवकही शोभायात्रेत सहभागी झाले होते. यावेळी आसिफ कर्नल, शेख अमीर, आसिफ कर्नल, हन्नुभाई, अब्दुल हमीद,गफ्फार भाई, सरफराज अहमद, वहीद कर्नल, अब्दुल हक आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.

मोमीनपुऱ्यात रामरथावर पुष्पवृष्टी
पोद्दारेश्वर मंदिरातून निघालेली शोभायात्रा मोमीनपुरा भागात येताच अमन शांती समितीचे अध्यक्ष बाबा खान यांच्यासह विविध मुस्लिम बांधवांनी रामरथावर पुष्पवृष्टी केली. यावेळी शांतीचे प्रतीक म्हणून कबुतरे उडविण्यात आली. मुस्लिम समाजातील युवकही शोभायात्रेत सहभागी झाले होते. यावेळी आसिफ कर्नल, शेख अमीर, आसिफ कर्नल, हन्नुभाई, अब्दुल हमीद,गफ्फार भाई, सरफराज अहमद, वहीद कर्नल, अब्दुल हक आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.