राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवनात आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या उपाध्यक्षा शैलजा जोग होत्या. उद्घाटक म्हणून डॉ. मनोरमा खोरगडे होत्या. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे सचिव अशोक थुल, मध्यवर्ती संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रहास सुटे, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष गोपीचंद कातुरे ,सरचिटणीस अशोक दगडे, संघटनेच्या पदाधिकारी नंदा क्षीरसागर व प्रतिभा सोनारे प्रामुख्याने उपस्थित होते. महिला व पुरुष ही विकासाची दोन चाके आहेत. या दोघांनी मिळून कार्य केल्यास समाजामध्ये मोठे परिवर्तन होऊ शकते, असे मत डॉ. मनोरमा खोरगडे यांनी व्यक्त केले. यानिमित्त जुने सचिवालय व जिल्हाधिकारी कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांच्या मुलांसाठी येथे पाळणाघर तयार करण्यात यावे, असा ठराव पारित करण्यात आला.
संगीता तभाने यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका विशद केली. संचालन मंजुषा सदावर्ते यांनी संचालन तर रेखा सय्याम यांनी आभार मानले. या कार्यक्रमास रचना बुलकुंदे, मंगला जाळेकर, विजया गायकवाड, शोभा सुटे, शुभदा बक्षी, शालीनी देशमुख, कांता राऊत, भारती गेडाम, रोहीनी आयलावार, मंदा शंभरकर, नारायण समर्थ, बुधाजी सुरकर, नाना कडबे, केशव शास्त्री आदी संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. आंबेडकर महाविद्यालय
डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील महिला विकास मंचाद्वारे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चारू बाहेती कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. ‘आधुनिक युगात स्त्रियांचे योगदान’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. स्त्रियांच्या सामाजिक, राजकारण, शैक्षणिक, आर्थिक इत्यादी क्षेत्रात सबलीकरण असणे या विषयावर भर दिला. मुलगा व मुलगी यामध्ये फरक करू नये. त्यांच्या पालनपोषणाच्या व्यवस्थेत बदल करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी स्त्रियांवरील ज्वलंत प्रश्नांविषयी चर्चा केली. कन्या भ्रूण हत्या, बलात्कार, लिंगभेद, कौटुंबिक हिंसा, हुंडाबळी, आरोग्य समस्या इत्यादी विषयावर विचार व्यक्त केले. प्राचार्य डॉ. के.एम. रेड्डी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. महिला विकास मंचच्या संयोजक डॉ. शोभा नरांजे यांनी स्वागतपर भाषण केले. महिलांनी आधी स्वत:चा मान राखला पाहिजे, तरच पुरुष त्यांना मान देतील, असे डॉ. रेड्डी म्हणाल्या. संचालन संध्या कलमधाड यांनी केले. डॉ. प्रतिभा सिरिया व दर्शिका पाटील यांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले.
महिला लोक आयोग
महाराष्ट्र राज्य महिला लोक आयोग, नागपूरच्या वतीने मानेवाडा येथील कार्यालयात सामाजिक कार्यकर्त्यां कल्पना तलवारकर यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्र राज्य महिला लोक आयोगाच्या नागपूर शाखेच्या संघटक सुजाता भोंगाडे, कवी मधुकर गजभिये, माधुरी सुपारे, शालीनी येसकर, उज्ज्वला हजारे, शीला बोरकर उपस्थित होत्या. आंदोलनाच्या पातळीवर राजकीय आणि न्यायालयीन पातळीवर महिला लोक आयोग स्पष्ट आणि सक्रीय भूमिका घेईल. राज्य घटनेला अभिप्रेत जात, धर्म, लिंग भेदापलीकडे लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्षता या राज्य घटनेने स्वीकारलेल्या तत्वानुसार आयोग काम करणार असून शांततामय मार्गाने आंदोलन व अहिंसेच्या विचारधारेशी बांधीलकी ठेऊन अहिंसक लढाऊ सत्याग्रह ही आयोगाची कार्यप्रणाली राहणार असल्याचे सुजाता भोंगाडे यांनी यांनी आयोगाची भूमिका व माहिती देताना सांगितले. कार्यक्रमाचे संचालन सुरेखा मानकर यांनी केले तर ज्योती ढोके यांनी आभार मानले. कार्यक्रमास मंदा गावंडे, विशाखा नगराळे, प्रमिला शेवाळे, छाया जुवार, सुनिती डोंगरे, विजया देशमुख, वनीता टेंभूर्णे, अमिता भोंगाडे, हर्षां बुलकुंडे, रंजना शेवाडे, सविता फुलपाटील आदी महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.
मध्य रेल्वे नागपूर मंडळ
मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या गुंजन सभागृहात आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या पूर्व संध्येला महिला सशक्तीकरण समिती आणि कर्मचारी लाभ निधीच्यावतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मध्य रेल्वे नागपूर महिला समाज सेवा समिती अध्यक्ष संगीता सिंह, उपाध्यक्ष मोनिका गुप्ता, मुख्य पाहुणे सपना शर्मा आणि डॉ. रेखा भूतडा उपस्थित होते. यावेळी सपना शर्मा म्हणाल्या, सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा व्यक्तीमध्ये सक्रिय असतात. त्यातील मध्यम मार्ग आत्मसात करायला हवा. आमच्यामध्ये सत्कारात्मक विचार असायला हवा. शिवाय आम्ही जो विचार करतो, त्यातून अंतर्गत आनंदाचा झरा वाहता हवा. त्यासाठी आम्हाला स्वत:हून बदल करावा लागेल. नकारात्मक विचारांना नेहमीच दूर ठेवायला हवे. डॉ. रेखा भूतडा म्हणाल्या, महिलांना घर आणि कार्यालयातील कामांमध्ये संतुलन करणे एवढे सोपे नसते. आरोग्याला स्वस्थ ठेवण्याच्या दृष्टीने त्यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
रेल्वे व्यवस्थापक ओ.पी. सिंह म्हणाले, ग्रामीण आणि शहरांमध्ये मुली शिक्षणामध्ये वेगाने पुढे जात आहेत. शिक्षण घेऊन भविष्यात येणाऱ्या पिढीला त्या चांगले शिक्षण देतील. समाज परिवर्तनासाठी शिक्षण हा सुदृढ मार्ग आहे. यावेळी डॉ. जयदीप गुप्ता, बी.के. पाणीग्रही, डॉ. मीरा अरोरा, आणि पुर्णिमा सुरडकर आदी रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.