राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवनात आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या उपाध्यक्षा शैलजा जोग होत्या. उद्घाटक म्हणून डॉ. मनोरमा खोरगडे होत्या. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे सचिव अशोक थुल, मध्यवर्ती संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रहास सुटे, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष गोपीचंद कातुरे ,सरचिटणीस अशोक दगडे, संघटनेच्या पदाधिकारी नंदा क्षीरसागर व प्रतिभा सोनारे प्रामुख्याने उपस्थित होते. महिला व पुरुष ही विकासाची दोन चाके आहेत. या दोघांनी मिळून कार्य केल्यास समाजामध्ये मोठे परिवर्तन होऊ शकते, असे मत डॉ. मनोरमा खोरगडे यांनी व्यक्त केले. यानिमित्त जुने सचिवालय व जिल्हाधिकारी कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांच्या मुलांसाठी येथे पाळणाघर तयार करण्यात यावे, असा ठराव पारित करण्यात आला.
संगीता तभाने यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका विशद केली. संचालन मंजुषा सदावर्ते यांनी संचालन तर रेखा सय्याम यांनी आभार मानले. या कार्यक्रमास रचना बुलकुंदे, मंगला जाळेकर, विजया गायकवाड, शोभा सुटे, शुभदा बक्षी, शालीनी देशमुख, कांता राऊत, भारती गेडाम, रोहीनी आयलावार, मंदा शंभरकर, नारायण समर्थ, बुधाजी सुरकर, नाना कडबे, केशव शास्त्री आदी संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. आंबेडकर महाविद्यालय
डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील महिला विकास मंचाद्वारे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चारू बाहेती कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. ‘आधुनिक युगात स्त्रियांचे योगदान’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. स्त्रियांच्या सामाजिक, राजकारण, शैक्षणिक, आर्थिक इत्यादी क्षेत्रात सबलीकरण असणे या विषयावर भर दिला. मुलगा व मुलगी यामध्ये फरक करू नये. त्यांच्या पालनपोषणाच्या व्यवस्थेत बदल करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी स्त्रियांवरील ज्वलंत प्रश्नांविषयी चर्चा केली. कन्या भ्रूण हत्या, बलात्कार, लिंगभेद, कौटुंबिक हिंसा, हुंडाबळी, आरोग्य समस्या इत्यादी विषयावर विचार व्यक्त केले. प्राचार्य डॉ. के.एम. रेड्डी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. महिला विकास मंचच्या संयोजक डॉ. शोभा नरांजे यांनी स्वागतपर भाषण केले. महिलांनी आधी स्वत:चा मान राखला पाहिजे, तरच पुरुष त्यांना मान देतील, असे डॉ. रेड्डी म्हणाल्या. संचालन संध्या कलमधाड यांनी केले. डॉ. प्रतिभा सिरिया व दर्शिका पाटील यांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा