कामाला प्रारंभ
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील सर्वात वर्दळीच्या रामनगर भागात सिमेंट रस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. वृन्दावन हॉटेल ते रामनगर रिक्षा स्थानकापर्यंत दीडशे मीटर लांबीचा हा रस्ता तयार करण्यात येणार आहे. दर वर्षी पावसाळ्यात शरपंजरी पडणाऱ्या या रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी होत असते. काँक्रिटीकरणामुळे ही कोंडी टळू शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे सर्व काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. या कामासाठी दोन कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. या रस्त्यानंतर मानपाडा रोड, टंडन रोड, केळकर हे रस्ते सिमेंटचे करण्यात येणार आहेत, असे सभापती कोमल पाटील यांनी सांगितले.

Story img Loader