महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस आणि येथील विजय फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित पु. ल. देशपांडे महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या नाशिक विभागीय फेरीत दीपक नाटय़ मंडळाच्या ‘चामखीळ’ ने प्रथम क्रमांक पटकावला. ‘सावडेकर तावडेकर हाजीर हो’ एकांकिकेने द्वितीय तर ‘तो, ती आणि आकडा’ ने तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेची अंतिम फेरी २४ व २५ नोव्हेंबर रोजी अकलूज येथे होणार असून विभागीय पातळीवर प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवलेले संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
नाशिक विभागीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस नाना महाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष छबू नागरे, नगरसेवक सचिन महाजन, कविता कर्डक उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते प्रथम क्रमांकाला दहा हजार, द्वितीय पाच हजार, तृतीय क्रमांकाला तीन हजार रूपये तर वैयक्तीक स्वरूपात प्रत्येकी ७०० रुपयांची पारितोषिके देण्यात आली.
 याव्यतिरिक्त पुरस्कारप्राप्त नाटकांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
नाशिक विभागीय फेरीत एकूण १६ संघानी सहभाग घेतला. नाशिकच्या दीपक नाटय़ मंडळाच्या ‘गे’ विषयावर आधारीत ‘चामखिळ’ या नाटकाने प्रथम क्रमांक मिळवला. उत्कृष्ट अभियनासाठी नुपूर सावजी, निखील भोर (चामखीळ), वेशभूषा प्राची कुलकर्णी, डॉ. प्राजक्ता लेले (इतिहासाच्या पुस्तकातून.), प्रकाश योजना उदय पाठक (आकडा), संगीत विपूर पाठक, मयुरेश शेंदुर्णीकर (ब्रेकअप के बाद), नेपथ्य रोहित पगारे (आकडा), लेखक सुनील सातबळेकर (मोकळा), दिग्दर्शक अमित शिंगणे, स्वरूप बागूल (चामखीळ) तर उत्तेजनार्थ पारितोषिकाने स्वराली हरदास, हर्षां केणेकर, मानसी पाठक, वासंतिक वाळवे, सौरभ टोचे, अजय तारणे, हेमंत पाटील, रोहित पगारे, विक्रम गवांदे यांना गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून हेमंत जोशी, जुगलकिशोर ओझा, डॉ. दिलीप घारे यांनी काम माहिले.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा