गृह राज्यमंत्री पाटील यांच्या ४१ व्या वाढदिवसानिमित्त बंटी पाटील प्रेमी ग्रुपतर्फे एकेरी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पॅव्हेलियन ग्राऊंड, कसबा बावडा येथे ३ दिवस चाललेल्या स्पर्धेत मुंबई, पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर, बेंगलोर, सिंधुदुर्ग आदी शहरातून सुमारे २६० खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती.
स्पर्धेत जलाल मुल्ला (कराड) याने व्दितीय, फैयाज शेख (पुणे) याने तृतीय व सल्लाउद्दीन शेख (मुंबई), महमंद साजिद शेख (मुंबई), शब्बीर अन्सारी (इचलकरंजी), श्रीकांत सोनवणे (पुणे) यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरव चौगले (कसबा बावडा) याची निवड करण्यात आली.
पारितोषिक वितरण समारंभामध्ये परिवहन समिती सभापती राजू पसारे, सभागृह नेते श्रीकांत बनछोडे, नगरसेवक अजित पवार, प्रदीप उलपे, विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, सचिन चौगले, मोहन सालपे, उचगांव सरपंच सुरेखा चौगले, राजू संकपाळ, उद्योगपती डी. डी. पाटील आदी उपस्थित होते.
संयोजन लखन तवार, धैर्यशील जाधव, संदीप पाटील, विनायक सूर्यवंशी आदींनी केले, तर सूत्रसंचालन व स्वागत प्राचार्य महादेव नरके यांनी व आभार किरण आडसूळ यांनी मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा