येत्या २८ जुलैला होणाऱ्या एएमएमआय पुणेद्वारा घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेला बसून आता एमबीए पूर्ण करता येणार आहे. या परीक्षेकरिता चंद्रपुरात सरदार पटेल महाविद्यालयांतर्गत इंस्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज रिसर्च येथे केंद्र म्हणून मान्यता असून याठिकाणी परीक्षेचे अर्ज व माहिती पुस्तिका उपलब्ध आहे. एमबीए प्रवेशाकरिता आवश्यक सीमॅट प्रवेश परीक्षा दिल्यानंतर मिळालेले गुण, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकरिता दिलेला पसंतीक्रम याआधारावर केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार प्रवेशाची पहिली फेरी नुकतीच झाली असून यानुसार एकीकडे पुण्या-मुंबईकडील नामांकीत सहा महाविद्यालयात केवळ एक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, तर दुसरीकडे चंद्रपुरातील सरदार पटेल महाविद्यालयांतर्गत इंस्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च येथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांला किमान ३५ पेक्षाही जास्त गुण आहेत.

Story img Loader