साऊथ इंडियन एज्युेकशन सोसायटी-श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, संगीतकार इलया राजा, विज्ञान आणितंत्रज्ञान विभागाचे सचिव के. विजय राघवन, कोटेसर राव यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. माटुंगा (पूर्व) येथील षण्मुखानंद श्री चंद्रशेखरंद्र सरस्वती सभागृहात १३ डिसेंबर रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
सामाजिक नेतृत्व, सार्वजनिक नेतृत्व, विज्ञान-तंत्रज्ञान आणि सामाजिक जाणीव अशा क्षेत्रांसाठी १९९८ पासून हे पुरस्कार देण्यात येत आहेत. प्रत्येकी २ लाख ५० हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
वरील क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या भारतीयांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार दिले जात आहेत. आत्तापर्यंत ५६ जणांना हा पुरस्कार मिळाला आहे. डॉ. शंकर दयाळ शर्मा, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, डॉ. आर. चिदम्बरम, डॉ. जयंत नारळीकर, सोमनाथ चॅटर्जी, एम. एस. सुब्बालक्ष्मी, डॉ. वर्गीस कुरियन, सुनील दत्त, दिलीप कुमार, सॅम पित्रोदा, अमिताभ बच्चन, सुषमा स्वराज आदींना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.  पुरस्कार वितरण सोहळ्यास कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती उपस्थित राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा