सांज लोकसत्ताचे माजी संपादक ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर वाघ यांच्यास्मृतिनिमित्त स्थापन करण्यात आलेल्या ‘चंद्रशेखर वाघ फाऊंडेशन’चा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला असून यावेळी पत्रकारीताक्षेत्रात मोलाचे योगदान असलेल्या ज्येष्ठ पत्रकार सुरेंद्र हसमनीस यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. तसेच सामाजिक क्षेत्रासाठीचा पुरस्कार ‘सर्वहारा जन आंदोलन’ या संस्थेला देण्यात येणार आहे. शुक्रवार १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता गडकरी रंगायतन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक आणि ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पत्रकारिता क्षेत्रात नव्याने येणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण देणे, गरजू पत्रकारांना अर्थिक सहाय्य करणे यासारखे विविध उपक्रम चंद्रशेखर वाघ फाऊंडेशन तर्फे राबविण्यात येणार आहे.
चंद्रशेखर वाघ फाऊंडेशनचा १९ जुलै रोजी शुभारंभ सोहळा
सांज लोकसत्ताचे माजी संपादक ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर वाघ यांच्यास्मृतिनिमित्त स्थापन करण्यात आलेल्या ‘चंद्रशेखर वाघ फाऊंडेशन’चा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला असून यावेळी पत्रकारीताक्षेत्रात मोलाचे योगदान असलेल्या ज्येष्ठ पत्रकार सुरेंद्र हसमनीस यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. तसेच सामाजिक क्षेत्रासाठीचा पुरस्कार ‘सर्वहारा जन आंदोलन’ या संस्थेला देण्यात येणार
आणखी वाचा
First published on: 12-07-2013 at 09:41 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar vagh foundation opening