बेस्टने आपल्या काही बसमार्गाच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. तसेच काही मार्गाचे प्रवर्तन खंडित करण्यात आले असून काही मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत. तर चार नवे मार्ग सुरू करण्यात येत आहेत.
कुलाबा ते नाडकर्णी पार्क बसमार्ग क्रमांक ९ सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत अ‍ॅन्टॉप हिलपर्यंत असेल.  आगरकर चौक ते शांतीनगर मार्गे मालपा डोंगरी ही   बस क्रमांक ६४१ आता मालपा डोंगरीपर्यंतच राहील. दामूनगर बस स्थानक ते घोडदेव नाका बस क्रमांक ७०८ दोन टप्प्यांमध्ये कार्यान्वित होईल. प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसादामुळे मिळत असल्यामुळे प्रतीक्षानगर ते सांताक्रूझ स्थानक (पूर्व) बस क्रमांक ३१५ रविवारी बंद राहील. मात्र प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे अहिल्याबाई होळकर चौक, चर्चगेट ते फ्री प्रेस जर्नल मार्ग धावणारी बस क्रमांक १००, घाटकोपर रेल्वे स्थानक (पूर्व) ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी बस क्रमांक ३९३ रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्यात येणार आहे. बस क्रमांक ८१, १७२, २५४, ४५६ यांचे मार्ग विस्तार केले आहेत. तर बस क्रमांक २२ मर्यादित, ५०, २३७, ३१९, ३२५, ३३५, ४२४, ६२१ च्या मार्गातही बदल झाले आहेत. पं. पलुस्कर चौक ते जिजामाता उद्यान दरम्यान बस क्रमांक १८, नाहूर रेल्वे स्थान (पूर्व) आणि खिंडीपाडा – भांडूप संकुल दरम्यान बस क्रमांक ६१७ सुरू करण्यात आल्या आहेत. हे बदल १ मार्चपासून अंमलात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा