विदर्भातील शेतीला नवी दिशा देण्यासाठी अहमदनगरचे कृषी अभ्यासक प्रा. सुभाष नलांगे यांनी नरखेड तालुक्यातील वडविहिरा परिसरात चौफेर शेती प्रकल्पाची उभारणी केली असून या पथदर्शक प्रकल्पाची मान्यवरांनी प्रशंसा केली.
कृषीरत्न डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जंयतीनिमित्त ‘नीरी’च्या विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमाला पद्भूषण डॉ. विजय भटकर, डॉ. रमेश ठाकरे, राज्याचे माजी कृषीमंत्री रणजित देशमुख व प्रा. सुभाष नलांगे उपस्थित होते. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवन कार्यावर पाहुण्यांनी विचार व्यक्त केले. प्रा. रमेश ठाकरे यांनी प्रा. सुभाष नलांगे यांच्या कृषीविषयक कार्याची माहिती उपस्थितांना दिली.
अहमदनगरचे प्रा. नलांगे यांनी विदर्भात कृषीविषयक २५ प्रकल्प उभारले आहेत. नागपूर जिल्ह्य़ातील वडविहिरा गावात त्यांनी ‘चौफेर शेती प्रकल्प’ उभारला आहे. या प्रकल्पात आठ प्रकारच्या फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. शेतात रस्त्याची आखणी करून दोन्ही बाजूला नारळाची झाडे लावण्यात आली आहेत. शेतक ऱ्यांनी या प्रकल्पाला भेट देऊन अहमदनगरच्या चौफेर शेतीची माहिती घेतली. या शेतीमध्ये निवडलेल्या फळझाडांमध्ये गोड चिकू, अॅपलबोर, हैदराबादी सीताफळ, कोकण बहाडोली जाभूळ, कालीपत्ती चिकू, पाच जातीचा आंबा, केसर, लाल पेरू अशा प्रकारच्या फळबागेची घनदाट पद्धतीने लागवड करण्यात आली आहे. चिंच व चिकूमध्ये भगव्या डाळिंबाची लागवड केली आहे. प्रत्येक फळबाग ही २० गुंठे क्षेत्राची आहे. ही फळबाग सेंद्रिय पद्धतीने उभी केली आहे.
यापुढेही ही फळबाग सेंद्रिय पद्धतीने करण्याचा आरती देशमुख यांचा मानस आहे. फळबागेसाठी ठिंबक सिंचनाचा वापर करून पाण्याची बचत करण्यात आली आहे.
या प्रकल्पाची जबाबदारी शेखर देशमुख व अशोक देशमुख यांनी घेतली असून प्रकल्पाला भेटी देणाऱ्या शेतकऱ्यांना ते माहिती देत आहेत. कार्यक्रमाला प्रा. बी.एन. शिंदे, शेतीमित्र गजानन गिरोलकर, शरद काथोटे,तेजेंद्र तातोडे, मिथुन चौधरी, संजय वैद्य आदी उपस्थित होते. अधिक माहितीसाठी शेतक ऱ्यांनी प्रा. सुभाष नलांबे यांच्याशी (९७६७५५१३९३) संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. रमेश ठाकरे यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा