रोख अनुदानाचा पुनर्विचार करावा आणि देशातील १०० टक्के जनतेला रास्त दरात धान्य उपलब्ध करून द्यावे, यांसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा या चारही तालुक्यांत तसेच नंदुरबार जिल्ह्यातही स्वस्त धान्य दुकानदार, शिधापत्रिकाधारक, हमाल आणि रॉकेल वितरकांनी रास्ता रोको आंदोलन केले. ११ ते १२ वाजेदरम्यान मुंबई-आग्रा महामार्ग, नागपूर-सूरत तसेच अन्य मार्गावरील वाहतूक थांबवून शासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अन्नसुरक्षा विधेयकातील काही मुद्दे देशातील शिधा वितरण प्रणालीवर विसंबून असलेल्या लाखो कुटुंबीयांसाठी धोकादायक ठरू शकतील, असे मत अखिल भारतीय स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने व्यक्त केले आहे. स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेतील हमाल व अन्य घटक तसेच शिधापत्रिकाधारकही या विधेयकाचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. याचाच एक भाग म्हणून सोमवारी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. भारतीय स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे कार्यकारिणी सदस्य तथा महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष महेश घुगे यांच्या नेतृत्वाखाली धुळे, शिरपूर व शिंदखेडा तसेच अन्य ठिकाणी आंदोलन झाले. शहादा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने दोंडाईचा रस्त्यावर आंदोलन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा