शाळांमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून चार लाखाने बेरोजगारांची फसवणूक केल्याप्रकरणी एका तरुणीसह दोघांना अजनी पोलिसांनी अटक केली. प्रणय दत्तराज नारनवरे (रा. रिपब्लिकन नगर, जरीपटका) व स्मिता रमेश गद्रे (रा. उल्हास नगर) ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना दिल्ली पब्लिक स्कूल व तुली पब्लिक स्कूल या शाळांमध्ये ओळख असल्याचे सांगत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्याच्या या आमिषाला बरेच बेरोजगार बळी पडले.
दिल्ली पब्लिक स्कूल व तुली पब्लिक स्कूल या शाळांमध्ये समन्वयक व सहायक कारकून या दोन पदांवर नोकरी लावून देण्यासाठी गजानन श्रावण मरघडे (रा. विश्वकर्मा नगर) व इतरांना स्मिताच्या घरी बोलावण्यात आले. नोकरीवर रुजू होण्याचे पत्र देऊन एकूण चार लाख पंधरा हजार रुपये आरोपींनी घेतले. हे पत्र घेऊन मरघडे व इतर बेरोजगार शाळांमध्ये गेले तेव्हा हे पत्र खोटे असल्याचे उघड झाले. डिसेंबर २०१२ नंतर हा प्रकार घडला. गजानन मरघडे व इतर बेरोजगारांनी तक्रार केली. पोलिसांनी प्रणय दत्तराज नारनवरे (रा. रिपब्लिकन नगर, जरीपटका) व स्मिता रमेश गदरे (रा. उल्हास नगर) या दोघांना अटक केली. 

Story img Loader