शहरापासून सात किलोमीटरवरील माळेगाव येथे एका वृद्ध दाम्पत्याला शासनाकडून मिळणारे पेन्शन बंद व्हावे, या उद्देशाने जिल्हा पुनर्वसन कार्यालयाची बनावट पत्रे बनवून खोटी माहिती दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात संगनमताने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकचे जगन्नाथ मिसर यांनी या घटनेची फिर्याद मनमाड पोलीस ठाण्यात दिली. बाळकृष्ण मिसर व कांतीलाल पाराशर (रा. माळेगावकर्यात) यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. माळेगाव येथील बाबुलाल पांडे यांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेखाली वृद्धापकाळ पेन्शन अनेक वर्षांपासून सुरू आहे. हे पेन्शन बंद व्हावे म्हणून त्यांचेच नातेवाईक असलेल्या बाळकृष्ण मिसर यांनी जिल्हा पुनर्वसन कार्यालयाचे बनावट नोटीसवजा पत्र पाठवून त्याद्वारे लिखित पत्र शासकीय प्रक्रियेनुसार सदर वृद्ध लाभार्थीना पाठविण्यात आले. त्याबाबत पांडे यांचे जावई फिर्यादी जगन्नाथ मिसर यांना, या पत्राचा संशय आल्याने जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घेतली असता नोटीस किंवा कोणतेही पत्र या कार्यालयाकडून लाभार्थी पांडे यांना पाठविण्यात आले नसल्याची माहिती उघड झाली. त्यामुळे जगन्नाथ मिसर यांनी दिलेल्या     तक्रारीनुसार   बनावट    दस्तऐवज तयार केल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader