मानवत तालुक्यातील किन्होळा शिवारात सीिलगमध्ये माजी सैनिकास मिळालेली आठ एकर ३२ गुंठे जमीन फसवणुकीने स्वत:च्या नावे करून घेतल्याप्रकरणी मानवतच्या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
माजी सैनिक बाबुराव रघुनाथ लांडे (मानवत) यांना किन्हाळा शिवारातील गट नं. २० मधील आठ एकर ३२ गुंठे जमीन सीलिंगमध्ये मिळाली होती. ही जमीन आरोपी अमृता अंबादास भदग्रे, अशोक अमृत भदग्रे, अनिल अमृता भदग्रे, सुधीर अमृता भदग्रे, सिद्धार्थ अमृता भदग्रे (बौद्धनगर, मानवत) यांनी संगनमत करून स्वत:च्या नावे करून घेतली व लांडे यांचा विश्वासघात केला. लांडे यांनी या अगोदर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु पोलिसांनी दखल घेतली नाही, म्हणून त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

Story img Loader