महाराष्ट्र भाषा अबॅक्स अभियानाच्या नावाखाली नोकरी लावण्याचे आमिष दाखवून नगर येथील विद्यासिद्धी एज्युकेशन संस्थेने पैसे गोळा केले. हा प्रकार उघड होताच विद्यार्थ्यांनी संस्थेच्या कार्यालयावर हल्ला चढवून सामानाची तोडफोड केली.
बीडच्या शिवाजीनगर भागात कार्यालय सुरू केलेल्या विद्यासिद्धी एज्युकेशन संस्थेने महाराष्ट्र भाषा अबॅक्स अभियानाच्या नावाखाली विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली. जिल्ह्य़ातील अनेक तरुण-तरुणी नोकरीच्या आमिषाला बळी पडले. या संस्थेने प्रत्येक उमेदवाराकडून अर्जाच्या नावाखाली २३० रुपये घेतले. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची गुरुवारी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परीक्षेचे हॉलतिकीट घेण्यास गेलेल्या उमेदवारांना पुन्हा ५० रुपये मागविण्यात आले. हा चक्क बनवाबनवीचा प्रकार असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यानंतर उमेदवारांनी कार्यालयातील सामानाची तोडफोड केली. पैसे मागणाऱ्या भामटय़ास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Story img Loader