दहशतवादी प्रतिबंधक पथक, श्वान पथक आणि बॉम्बशोध नाशक पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे परभणी बसस्थानकाची शनिवारी दुपारी तपासणी करून सुरक्षिततेची पाहणी केली. साध्या वेशातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व श्वान यांनी स्थानकात उभ्या असलेल्या बसची तपासणी सुरू केल्यानंतर प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता.
पोलीस प्रशासनाच्या वतीने गर्दीच्या ठिकाणी तपासणी करून सुरक्षिततेचा आढावा घेतला जातो. दहशतवादी हल्ल्यानंतर करावयाच्या उपाययोजनेचे प्रात्यक्षिक केले जाते. या अनुषंगाने आज दुपारी परभणी बसस्थानकाची तपासणी करण्यात आली. स्थानकावरील व बसमधील प्रवाशांच्या सामानाची ‘मेटल डिटेक्टरने’तपासणी करण्यात आली. तसेच बेवारस वस्तूंची तपासणी झाली. हे सर्व चालू असतांना प्रवासी घाबरले होते. काही वेळाने ही तपासणी सुरक्षिततेचा भाग असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रवाशांच्या जीवात जीव आला. एटीएसचे सहायक पोलीस निरीक्षक बी. एल. पेडगावकर, पोलीस कर्मचारी नेताजी गिते, सुग्रीव केंद्रे, ज्ञानेश्वर चोपडे, आगलावे, श्रीराम किरवले, शे.वहीद शे.रशीद, शेख महेबूब यांचा तपासणी पथकात समावेश होता. परभणीतील जिंतूर रोड व वसमत रोड शहराबाहेरील चौपाल सागरचीही तपासणी करण्यात आली.
परभणी बसस्थानकाची बॉम्बशोध पथकाकडून तपासणी
दहशतवादी प्रतिबंधक पथक, श्वान पथक आणि बॉम्बशोध नाशक पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे परभणी बसस्थानकाची शनिवारी दुपारी तपासणी करून सुरक्षिततेची पाहणी केली.
First published on: 30-06-2013 at 01:30 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Checking of parbhani bus stand by bomb search squad