पुरातत्त्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाने विकसित केलेल्या कोल्हापूर वस्तू संग्रहालयाच्या टाऊन हॉल बागेतील नूतनीकरण केलेल्या वास्तूचा शुभारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. यामुळे अनेक दिवसांपासून बंद स्थितीत असलेला टाऊन परिसरातील ऐतिहासिक वस्तूंचा खजिना खुला झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी नूतनीकरण केलेल्या वास्तूचा शुभारंभ करून वस्तू संग्रहालयाची पाहणी केली. या विभागाचे संचालक संजय पाटील यांनी वस्तू संग्रहालयातील उभारणीची तसेच तेथे असलेल्या विविध वस्तूंची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी वस्तू संग्रहालयाच्या अभिप्राय नोंद वहीत आपला अभिप्राय नोंदविला.
या वेळी मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, महापौर जयश्री सोनवणे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मंडलिक,आमदार चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाधिकारी राजाराम माने, महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्यासह शासकीय अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
 

Story img Loader