व्यापारी महासंघाच्या वतीने जानेवारीत मराठवाडास्तरीय अधिवेशन घेण्यात येणार आहे. हे अधिवेशन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हावे, म्हणून व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनास येण्याचे मान्य केल्याची माहिती संघाचे जिल्हा अध्यक्ष शामप्रकाश देवडा यांनी दिली.
अधिवेशनाची माहिती देताना देवडा यांनी सांगितले की, राज्यातील नवनवीन कायदे, कामगार कायदा, अन्न भेसळचा नवीन कायदा व त्यातील परवान्याची किचकट प्रक्रिया, व्यवसायकर, आयकर, व्ॉटचा कायदा यांसारख्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सखोल चर्चा व्हावी व नवनवीन कायदे, नियम यातून व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी कशा दूर करता येतील, या बाबत विचार व्हावा हा या अधिवेशनामागील हेतू आहे. अधिवेशनाला उपस्थित रहावे, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचे उद्घाटन व्हावे, या दृष्टीने हिंगोलीतून आमदार राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी संघाचे पदाधिकारी नंदकिशोर तोष्णीवाल, जेठानंद नैनवाणी, घनशामजी झंवर, धरमचंद वडेरा, प्रकाशचंद सोनी आदींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा