गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ अंध, अपंग, मूक-बधीर, कर्णबधीर तसेच बहुविकलांग मुलांच्या विकसनासाठी झटणाऱ्या ‘नाटय़शाला’ या संस्थेतर्फे सर्वशिक्षा अभियान अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय बालनाटय़ स्पर्धेची अंतिम फेरी गुरुवार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायं. ६ वा.पर्यंत प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात होणार आहे.
बीड, वाशिम, सोलापूर, परभणी, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद आणि भंडारा येथील जिल्हा परिषद शाळा या अंतिम फेरीत आपली बालनाटय़े सादर करणार आहेत.
हॉंगकॉंगच्या मिलिपीड फौंडेशनने ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे. स्पर्धेनंतर लगेचच पारितोषिक वितरण समारंभ होणार असून, त्यास महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक अ. द. काळे, सहसंचालक नंदन नांगरे आणि ‘चौरंग’चे अशोक हांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 20-02-2013 at 12:39 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Childrens drama competition by drama school