दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर या वर्षी सिलिकॉन व्हॅली या आयटी शिक्षण संस्थेने कोणताही गाजावाजा न करता आपल्या वर्धापनदिनी येथील त्र्यंबक रस्त्यावरील अनाथ बालकाश्रमातील मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच धान्य वाटप केले.
डॉ. रत्नाकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अनाथ बालकाश्रमात सध्या १८ मुले आहेत. विविध संस्थांच्या देणगी आणि मदतीवर या मुलांचे संगोपन होत आहे. या प्रसंगी सिलिकॉन व्हॅलीचे संचालक प्रमोद गायकवाड, समन्वयक प्रकाश गायकवाड, पंकज गोखले तसेच बालकाश्रमाचे व्यवस्थापक रणसिंग यावेळी उपस्थित होते. १९९८ मध्ये अक्षय्य तृतीयेला सिलिकॉन व्हॅलीची येथे स्थापना झाली. गरीब, मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना परवडेल, असे आंतरराष्ट्रीय आयटी शिक्षण देण्याच्या प्रमुख उद्देशाने संस्था सुरू करण्यात आली होती. केवळ शिक्षण नव्हे तर, आयटी अभ्यासक्रमानंतर या क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठीही विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाते.
शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करीत असताना संस्थेने सामाजिक भान सतत जपले आहे. दरवर्षी पाच आदिवासी विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण भार संस्था उचलते.