महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने २९ नोव्हेंबर रोजी नंदुरबार येथे आयोजित उत्तर महाराष्ट्र कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या पूर्व तयारीकरिता बुधवारी सकाळी ११ वाजता नाशिक शहर काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्ष, सेल व आघाडीप्रमुखांची महात्मा गांधी रोड येथील काँग्रेसभवन येथे बैठक होणार आहे.
या बैठकीस आ. जयप्रकाश छाजेड, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शोभा बच्छाव, प्रदेश सचिव आश्विनी बोरस्ते, गटनेते लक्ष्मण जायभावे, हे मार्गदर्शन करणार आहेत.
बैठकीस शहरातील सर्व ब्लॉक अध्यक्ष व आघाडीप्रमुखांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शहराध्यक्ष अ‍ॅड. आकाश छाजेड यांनी केले आहे.    

Story img Loader