वसमतच्या नगराध्यक्षा कुमुदिनी बडवणे यांनी गुरुवारी आपला राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे सुषमा बोड्डेवार यांना नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.वसमत नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले. अध्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या अलिखित कराराप्रमाणे पहिले वर्ष अध्यक्षपद शिवसेनेकडे, तर उर्वरित दीड वर्षं भाजपाला अध्यक्षपद देण्याचे ठरले होते. त्यानुसार बडवणे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन बोड्डेवार यांना नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग गुरुवारी मोकळा करून दिला. गुरुवारी बडवणे यांनी कारकिर्दीतील अखेरची विशेष सभा घेतली. सभेचे कामकाज आटोपल्यानंतर प्रभारी जिल्हाधिकारी अमगा यांच्याकडे राजीनामा सोपविला. या वेळी माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी बडवणे यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा मंजूर केला. नवीन अध्यक्षांची निवड होईपर्यंत अध्यक्षपदाची सूत्रे उपजिल्हाधिकारी दीपाली मोतीयाळे यांच्याकडे सोपविली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा