वेबसाईटकडे पोलिसांचे दुर्लक्ष नाही, असे सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना यांनी स्पष्ट केले. शहर पोलिसांच्या वेबसाईटबाबत पूर्ण कल्पना आहे. ही साईट कशी असावी, त्यावर नवी कुठली माहिती अपलोड करावी, याचे नियोजन सुरू आहे. निधीची अडचण नाही. लवकरच ही वेबसाईट आकर्षक, रेखीव, माहितीने परिपूर्ण झालेली असेल, असे सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना यांनी‘लोकसत्ता’ला सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहर पोलिसांच्या वेबसाईटवर खुद्द पोलीस आयुक्तांचाच संदेश नाही. वेबसाईट अद्ययावत करण्यासाठी सध्या निधीच उपलब्ध नसल्याची माहिती आहे. ‘अंडर कन्स्ट्रक्शन’ असा उल्लेख करून केवळ दिवस ढकलणे सुरू असून परिणामी ती केवळ शोभेची बाहुली ठरली आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यात संगणकाचा वापर करण्याचे ठरविल्यानंतर शहर पोलिसांची वेबसाईट सुरू झाली. त्यात बरीच माहिती आहे. मात्र, कालांतराने त्याकडे दुर्लक्ष झाले. विशिष्ट माहिती नेहमीसाठी उपयोगी असली तरी अनेक ठिकाणी बदल करणे क्रमप्राप्त आहे. मात्र, असे झालेले नाही. नवे पोलीस आयुक्त कौशल पाठक यांचे छायाचित्र आहे, एवढा अपवाद सोडला तर त्यात कुठलेच बदल केले गेलेले नाहीत. पोलीस आयुक्तांचा जनतेला संदेश वा सूचना नाहीत. ‘रेडी रेकनर’मध्ये पोलीस आयुक्तांची परिचयात्मक माहिती नाही. पोलीस उपायुक्त सुनील कोल्हे व श्रीप्रकाश जयस्वाल, सहायक पोलीस आयुक्त ए. टी उईके रुजू होऊन अनेक दिवस झाले, मात्र त्यांची छायाचित्रे नाहीत. सहायक पोलीस आयुक्त यशवंत कुथे सेवानिवृत्त झाले. प्रतापनगरचे पोलीस निरीक्षक अनिल बेणके यांची बदली झाली. वेबसाईटवर मात्र ते कायम आहेत.
विविध उपक्रम, कार्यक्रमांची छायाचित्रे अत्यल्प आहेत. त्यातील दोन छायाचित्रांचा अपवाद सोडल्यास सर्व छायाचित्रे फारच जुनी आहेत. संबंधित अधिकारी दुसऱ्या ठिकाणी बदलून गेले तर काही सेवानिवृत्त झाले आहेत. वर्तमान अधिकाऱ्यांचा उल्लेखच त्यावर नाही. ‘फ्लॅश’ अंतर्गत दिलेली माहिती नेहमीसाठी उपयोगी असली तरी त्यातील उल्लेख असलेल्या अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. ‘स्टॅटिस्टिक ऑफ क्राईम’ अंतर्गत दिलेली माहिती आता रेकॉर्ड ठरली आहे. गेल्या २०१२ या वर्षांतील आकडेवारी अद्यापही त्यावर नाही. दैनंदिन गुन्ह्य़ांचे वार्तापत्र नियमित अपलोड केले जाते.
शहर वाहतूक विभागाची स्वतंत्र लेबसाईट आहे. त्यात ‘लेटेस्ट अनाऊसमेंट’मध्ये सरदार पटेल चौक ते बैद्यनाथ चौक हा रस्ता एकमार्गी करण्याची सूचना सहपोलीस आयुक्तांनी २२ ऑगस्ट २०१२ रोजी काढली होती. तेथील बांधकाम पूर्ण होऊन हा रस्ता सुरू झाला त्यास तीन-चार महिने झाले. ही सूचना मात्र अद्यापही यावर कायम आहे. ‘ट्रॅफिक कॅलेंडर’ २०११चे आहे. त्यात अद्यापही बदल केलेला नाही. ‘ट्रॅफिक क्राईम स्टॅटिस्टिक’मध्ये २००६ ते २०१०चा आलेख आहे. त्यापुढील आकडेवारीच नाही. ‘मिसिंग व्हेईकल्स’मध्ये माहितीच नाही. ‘प्रेस रिलिजेस’मध्ये कार्यक्रमाची चार छायाचित्रे आहेत. वेबसाईटकडे संबंधित खात्याचा आरसा म्हणून पाहिले जाते. संबंधित खात्याविषयी परिपूर्ण माहिती त्यात असायला हवी. गोपनीयतेचा बागुलबुवा उभा करून महत्त्वपूर्ण माहिती दिली जात नाही. गुन्ह्य़ांची आकडेवारी हे त्याचे उदाहरण आहे. शहर पोलिसांचे वेबसाईटकडे दुर्लक्ष असल्याचे उघड झाले आहे. वेबसाईटसाठी शहर पोलिसांकडे निधी उपलब्ध नसल्याची माहिती आहे. एका मदतगाराच्या मदतीने ही वेबसाईट सुरू झाली. त्यासंबंधीचा करार संपला. वेबसाईटचे भाडे कसे द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे साईट अद्ययावत करण्याचे काम थांबले असल्याचे समजले.