सांगली महापालिका निवडणुकीत झालेल्या गैरप्रकाराबाबत न्यायालयात दाखल झालेल्या दाव्यांची सुनावणी उद्या (मंगळवारपासून) सुरू होत असून, न्यायालयाने तशा नोटिसा निवडणूक आयोग, महापालिका आणि उमेदवारांना बजावल्या आहेत. विद्यमान नगरसेवक सुरेश आवटी, मनुद्दीन बागवान, शिवाजी दुर्वे, विवेक कांबळे, अनिल कुलकर्णी आदींसह बारा नगरसेवकांना न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
महापालिकेची निवडणूक जुलैमध्ये झाली. या निवडणुकीत पशाचे वाटप, मतदारांवर दहशत निर्माण करणे, अशाप्रकारच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. निवडणूक निकालानंतर पराभूत उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात आव्हान याचिका दाखल केल्या आहेत. बारा विद्यमान नगरसेवकांविरुद्ध वीस जणांनी ही आव्हान याचिका दाखल केली आहे. दिवाणी न्यायालयाने या याचिका दाखल करून घेतल्या आहेत. वेगवेगळय़ा न्यायालयात दावे न चालवता एकाच न्यायालयात त्या वर्ग केल्या आहेत.
ज्यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सुरेश आवटी, मनुद्दीन बागवान, विवेक कांबळे, अनिल कुलकर्णी, जुबेर चौधरी, युवराज गायकवाड, शांता जाधव, शिवाजी दुर्वे, संगीता खोत यांचा समावेश आहे. आवटी आणि बागवान यांना महापालिकेवर दगडफेक केल्याप्रकरणी शिक्षा झाली. त्यांच्या शिक्षेला स्थगिती नसतानाही निवडणूक लढवली आहे. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे जुबेर चौधरी व अपक्ष अनिल कुलकर्णी यांच्याविरोधात मतदानासाठी पशाचे वाटप केल्याचा आक्षेप आहे. पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हेही दाखल झाले आहेत. तर अन्य नगरसेवकांमध्ये जातीचे प्रमाणपत्र बोगस आहे, मतदानप्रकियेतील घोळ, अतिक्रमण करून घरे बांधल्याचा आरोप करण्यात आला आहे. या याचिकांवर उद्यापासून (मंगळवार) सुनावणी होणार असून, न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग, महापालिका आणि संबंधित उमेदवार यांना नोटिसा बजावल्या आहेत. सर्वच याचिकांची एकाच दिवाणी न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा