उत्साहाला उधाण आणणारा गणेशोत्सव जेमतेम आठ दिवसांवर आला आहे. विघ्नहर्त्यां गणरायाचे आपल्या घरातील वास्तव्य सुखकारक ठरावे, गणेशोत्सव काळात घर आणि परिसर प्रसन्न असावा यासाठी आपण काळजी घेत असतो. घराची आणि परिसराची स्वच्छता मन प्रसन्न ठेवते आणि उत्सवाचा उत्साहदेखील द्विगुणित करते. उत्सवाच्या काळात दैनंदिन व्यवहार काही वेळा सुस्तावतात, आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणून, परिसरात अस्वच्छता पसरते. मुंबईत कचऱ्याची समस्या ही कायमचीच डोकेदुखी आहे. त्यामुळे, सणासुदीच्या काळात तरी परिसर स्वच्छ असावा, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. त्यासाठी पालिकेसारख्या प्रशासन यंत्रणांनी जागरूक राहणे गरजेचे असले, तरी परिसर कचरामय होऊ नये याची पहिली काळजी प्रत्येक सुजाण नागरिकानेच घेतली पाहिजे. म्हणूनच, गणेशोत्सवाआधी आपापल्या परिसराच्या स्वच्छतेसंबंधी जागरूकता निर्माण करण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण मिळून सारेजण करू या..
आपल्या परिसरातील घाणीचे साम्राज्य, कचऱ्याने ओसंडून वाहणाऱ्या कुंडय़ांची सफाई व्हावी, इतस्तत: विखुरलेले कचऱ्याचे ढिगारे वेळेवर उचलले जावेत आणि गणरायाच्या स्वागतासाठी स्वच्छ मुंबई सज्ज व्हावी, असा हा एक प्रयत्न आहे..
यासाठी, आपल्या परिसरातील कचरामय ठिकाणे शोधा, आणि स्पष्ट छायाचित्रे आमच्याकडे आजपासून रोज पाठवा. छायाचित्रासोबत, परिसराचा नेमका पत्ता, छायाचित्र घेतल्याचा वार, दिनांक आणि वेळ, आपले नाव आणि संबंधित पालिका विभाग कार्यालयाचा क्रमांक आठवणीने नमूद करा.
अशा ठिकाणांची दखल घेऊन तेथील कचरामुक्तीच्या मोहिमेला प्राधान्य दिले जावे, यासाठी ही एक जनजागरण मोहीम ठरेल..
आपला लहानसा सहभाग ‘स्वच्छ मुंबई’साठी मोलाचा ठरेल, आणि मुंबापुरीत ‘स्वच्छ गणेशोत्सव’ साजरा होईल.
आपण घेतलेली छायाचित्रे loksattavruttant@gmail.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.
‘स्वच्छ गणेशोत्सव’
उत्साहाला उधाण आणणारा गणेशोत्सव जेमतेम आठ दिवसांवर आला आहे. विघ्नहर्त्यां गणरायाचे आपल्या घरातील वास्तव्य सुखकारक ठरावे, गणेशोत्सव काळात घर आणि परिसर प्रसन्न असावा यासाठी आपण काळजी घेत असतो. घराची आणि परिसराची स्वच्छता मन प्रसन्न ठेवते आणि उत्सवाचा उत्साहदेखील द्विगुणित करते.
First published on: 11-09-2012 at 01:48 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clean ganesh litter free mumbaiawareness