बालनाटय़ चळवळीत गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या प्रतिभा मतकरी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत ५ ऑक्टोबरपासून ‘स्वच्छ भारत अभियान’ या मोहिमे अंतर्गत विविध ठिकाणी पथनाटय़े सादर होत आहेत. याअंतर्गत आज, ७ ऑक्टोबर रोजी शीव बस आगार, शीव रुग्णालय, लक्ष्मी उद्यान, किंग्ज सर्कल, वरळी, दूरदर्शन केंद्र या ठिकाणी अनुक्रमे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पथनाटय़ सादर होणार आहे.   
८ ऑक्टोबर रोजी या पथनाटय़ उपक्रमाचा समारोप होणार आहे. या दिवशी गेट वे ऑफ इंडिया, मंत्रालय, भारतीय आयुर्विमा महामंडळ, योगक्षेम, नरिमन पॉइंट, इरॉस चित्रपटगृह आणि आकाशवाणी केंद्र येथे पथनाटय़े सादर होणार असून त्यांच्या वेळा अनुक्रमे १० ते दुपारी २ अशा आहेत. हे पथनाटय़ एक तासाचे असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clean india campaign road shows at dadar shivchurchgate