मल्लाबाई वल्याळ दंत महाविद्यालयाने जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा एकही हप्ता थकीत नाही. चालू कर्ज खाते असतानाही गुन्हा दाखल करून आपणास अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याने सकाळीच बँकेत पसे भरण्यास पाठवले. मात्र, बँकेने ते पसे घेतले नाहीत. त्यामुळे हैदराबाद बँकेतून ऑनलाईन ३ कोटी जमा केले, तरी पसे भरल्याची पावती देण्यास टाळाटाळ केली. बँकेचे आपणाकडे एक रुपयाही कर्ज नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही आपल्या संस्थांकडील थकबाकी भरावी. प्रशासकांनी कारवाई केली असली, तरी आणखी काहीजणांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्वावरच कारवाई करावी, अशी मागणी खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच बँक बुडवली हे आता स्पष्ट झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
जिल्हा बँकेतील कर्जप्रकरणी प्रशासकीय अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी बुधवारी मध्यरात्री जिल्हय़ातील बडय़ा थकबाकीदारांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर तातडीने मुंडे यांनी येथे येऊन पत्रकार बठक घेतली. मुंडे म्हणाले की, जिल्हा बँकेतील थकबाकीदार व बनावट कर्जप्रकरणी प्रशासकांनी मागील वर्षभरात केलेल्या कारवाईत पक्षपातीपणा होत असल्याचा जाहीर आरोप आपण केला होता. बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळ व संस्थांकडील थकबाकीसाठी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या काही बडय़ा नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. आपल्या कुटुंबाशी संबंधित सोलापूरच्या वल्याळ दंत महाविद्यालयाकडे २ कोटी ८१ लाख कर्ज आहे. एकही हप्ता थकीत नाही.
राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित यांच्या जयभवानी साखर कारखान्याकडे १७ कोटी १२ लाख रुपये थकीत असताना इतर कारखान्यांप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही? त्यांच्या माऊली सूतगिरणी, जयभवानी व जगदंबा शिक्षण संस्थांकडे असलेल्या कर्जप्रकरणीही कारवाई का होत नाही? असा प्रश्न उपस्थित करून प्रशासकांनी सर्वाना समान न्याय द्यावा, अशी मागणी केली. बँक बुडवून त्याचा ठपका आपणावर ठेवण्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी षड्यंत्र रचल्याचा आरोपही त्यांनी केला. बँकेतून सर्वाधिक कर्ज राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी घेतले. त्यामुळे अजित पवार यांनी आपल्या खाली काय जळते आहे हे पाहावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
मुंडे तासभर बँकेत
दंत महाविद्यालयाचे पसे भरल्यानंतरही पावती मिळत नसल्याचे सांगून पत्रकार बठकीतून मुंडे थेट जिल्हा बँकेत दाखल झाले. या वेळी बँकेत एकही वरिष्ठ अधिकारी नव्हता. मुंडे यांनी बँकेत उपस्थित कर्मचाऱ्यांना पसे भरल्याची पावती द्या, अशी मागणी केली. मात्र, वरिष्ठ नसल्यामुळे पावती देण्यास कोणी तयार नव्हते. पावती घेतल्याशिवाय जाणार नाही, अशी भूमिका घेत मुंडेंनी ठाण मांडले. अखेर जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांना या बाबत कल्पना दिल्यानंतर बँकेत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. पावती मिळाल्यानंतर मुंडे बँकेतून बाहेर पडले.

Story img Loader