दुकान गाळय़ाच्या दस्ताची नोंद करण्यासाठी नऊ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून मलकापूरचा तलाठी श्रीरंग पाडुंरग जाधव व खासगी कारकून रामचंद्र जाधव यांना पकडले.
म्हासोली-शेवाळेवाडी येथील प्रदीपकुमार विलास शेवाळे व काले येथील संजय तुकाराम पवार यांनी कलश प्रेस्टीज या इमारतीमधील दोन गाळे नोंदणीकृत दस्ताने खरेदी केले आहेत. त्याची नोंद मलकापूर तलाठी कार्यालयात करून त्याचे उत्तर देण्यासाठी तलाठी श्रीरंग जाधव व खासगी कारकून विजय जाधव यांनी प्रदीपकुमार शेवाळे व संजय पवार यांना प्रत्येकी पाच हजार अशी एकूण दहा हजारांची लाच मागितली होती. त्यासंदर्भात संबंधित दोघांनी सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी संबंधित दोघांना योग्य त्या सूचना दिल्या. दरम्यान, तडजोडीअंती संगनमताने तलाठी श्रीरंग जाधव व कारकून विजय जाधव यांनी नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारली आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तलाठी जाधव व कारकून यांना पकडले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा