गोकुळने नऊ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार पाडला आहे. दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी जातिवंत जनावरांसोबतच सुधारित हिरव्या वैरणीचा वापर आवश्यक असला, तरी ही वैरण ठरावीक काळातच उपलब्ध असते. अशावेळी हिरवी वैरण मुरघास (सायलेज) स्वरूपात साठवून ठेवणे आवश्यक असल्याने गोकुळने साठवणुकीची ही प्रभावी पद्धत राबविण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली.    
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय विकास योजनेंतर्गत नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळ दूध संघामार्फत नानीबाई चिखली (ता.कागल) येथे मुरघास प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. या वेळी डोंगळे बोलत होते.    
प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी सोलापूर जिल्हा दूध, राजाराम बापू दूध संघ तसेच गोकुळ संघाचे प्रशिक्षणार्थी हजर होते. गोकुळचे सहायक संचालक हेमंत श्रीखंडे यांनी मुरघासबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. गोकुळच्या डॉ.पल्लवी कुलकर्णी आहार संतुलन कार्यक्रमाबाबत माहिती दिली. मायक्रो ट्रेनिंग सेंटरचे अरविंद पाटील यांनी चारा नियोजनाबाबत चर्चा केली. गोकुळचे कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी १५ टन हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्यात आला. आनंदी संस्था (गुजरात), डॉ.दिग्विजय सिंह व महेशकुमार यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक घेण्यात आले. संचालिका अरुंधती घाटगे, व्यवस्थापक डॉ.चोथे व कापडिया आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा