थर्टी फस्टच्या रात्री विमानतळ येथील सिम्बायोसिस कॉलेजसमोर चरस व एल.एस.डी पदार्थाची विक्री करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणास अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून ५८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
आयुष रतनलाल टिक्कू (वय २४, रा. टिंगरेनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. हा एमआयटी कॉलेजमध्ये संगणकशास्त्र अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांला शिकत आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांना विमानतळ येथील सिम्बायोसिस कॉलेजसमोर एक तरुण अमली पदार्थाची विक्री करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तांबे हे अधिक तपास करत आहेत.
चरस विक्री प्रकरणी महाविद्यालयीन तरुणास अटक
थर्टी फस्टच्या रात्री विमानतळ येथील सिम्बायोसिस कॉलेजसमोर चरस व एल.एस.डी पदार्थाची विक्री करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणास अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून ५८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
First published on: 03-01-2013 at 03:39 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: College students got arrest in charas saleing case