स्थानिक संस्था कराच्या विरोधात राज्यभरात व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनास नांदेड जिल्हय़ात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
नांदेडमध्ये यापूर्वीच स्थानिक संस्था कर सुरू झाला. राज्यातल्या काही महापालिकांमध्ये हा कर नव्याने लागू होत असल्याने तेथील व्यापाऱ्यांनी त्याला तीव्र विरोध दर्शवत आंदोलनाचे हत्यार उपसले. राज्यातील व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या ‘बंद’ला पाठिंबा म्हणून नांदेड जिल्हय़ातील व्यापारीही ‘बंद’मध्ये सहभागी झाले होते.
महापालिका हद्दीतील कापड व्यापारी, किराणा र्मचट होलसेल अँड रिटेल, सराफा, जनरल र्मचट, इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक, मेंटल व अन्य व्यापारी संघटनांनी स्थानिक संस्था कराविरोधात पुकारलेल्या ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सोमवारी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या उपस्थितीत बैठक झाली. ‘बंद’मुळे वजिराबाद, श्रीनगर, जुना मोंढा, नवा मोंढा, शिवाजीनगर भागात शुकशुकाट होता. ‘बंद’ला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा व्यापारी गोविंद क्षीरसागर यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा