कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात अभ्यास मंडळ आणि चित्र प्रदर्शनचे उद्घाटन डॉ. विलास चोपडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.आर. दीक्षित होते. प्रा. डॉ. विलास चोपडे यांनी येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत तसेच निरनिराळ्या व्यवसायाच्या क्षेत्रात वाणिज्य विषयाचे महत्त्व मुलींना समजावून सांगितले. महाविद्यालयात वाणिज्य अभ्यास मंडळांतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ प्रत्येक मुलीने घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. दीक्षित यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. किरण नेरकर व संचालन स्वाती हटवार यांनी केले. नयना लक्षणे हिने आभार मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. वैरागडे, डॉ. मिलिंद गुल्हाने, डॉ. भेंडे, प्रा. प्रशांत गुल्हाने, प्रा. लक्ष्मण गायकवाड व कर्मचारी उपस्थित होते. 123
संग्रहित लेख, दिनांक 17th Nov 2012 रोजी प्रकाशित
वाणिज्य अभ्यास मंडळाचे उद्घाटन
कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात अभ्यास मंडळ आणि चित्र प्रदर्शनचे उद्घाटन डॉ. विलास चोपडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.आर. दीक्षित होते. प्रा. डॉ. विलास चोपडे यांनी येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत तसेच निरनिराळ्या व्यवसायाच्या क्षेत्रात वाणिज्य विषयाचे महत्त्व मुलींना समजावून सांगितले.

First published on: 17-11-2012 at 12:38 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commerce study mandal innogration